Now Loading

  संग्राम पतसंस्था पलुस  23  वा वर्धापन दिनानिमित्त               ** विश़्वास ,पतसंस्था            यातुन  आर्थिक                    विकासा साठी संग्राम   बापुसाहेब येसुगडे ,                     इसवी सन 1998 सालचा काळ ,पलुसचा ग्रामिण पण आर्थिकदृष्ट्या विकसन शिलतेच्या मार्गावरचा काळ,शेतीसमृद्ध भाग व अनेक छोटेमोठे  व्यावसायिक ,नवउद्योजक व द्राक्षबागांची उभारणी प्रकियेमध्ये लोकांना आर्थिक गरज ही आलीच ती पुर्ण होताना लोकांना येणारी अडचण ओळखुण मा विठठलराव तथा बापुसो बबनराव येसुगडे यांनी परिसरातील सहकारी मित्रांना बरोबर घेवुन संग्राम संस्थेची स्थापन केली ,बापुसाहेब हे  कल्पकता  व नवनविन संकल्पाचे प्रणेते होते ,संस्थेचे माध्यमातुन ठेवीला दिला जाणारा आकर्षेक  व्याजदर ,घरपोच विनम्र सेवा व सुलभ तात्काळ कर्जपुरवठा ह्यामुळे पलुस बाजारपेठेत व परिसरात अल्पावधीत नावारुपास आलेली संस्थेने सभासदांचे मागणीनुसार व सुलभ सेवेचे साठी शाखा विस्ताराचा निर्णय घेत पलुस औद्योगिक वसाहत तासगाव ,सावळज ,येळावी ,सावंतपुर वसाहत ,इस्लामपुर  शिराळा ,विटा ,कडेगांव भिलवडी ,आंधळी व  सांगली येथे सुसज्ज सर्वसोईनियुक्त शाखा सुरु केल्या तर संस्थेच्या ताकारी चिंचणी(अंबक)आष़्टा व मणेराजुरी हया शाखाही लवकरच सेवेत येत आहेत ,आज संस्थेकडे 52 कोटीहुन अधिक ठेवी तर 40 कोटीची कर्जे तर 14 कोटीची गुतंवणुक तर संस्थेची स्वमालकीची 35 कोटीहुन अधिक रक्कमेची मालमत्ता हे सारे वैभव व असंख्य ग्राहकांचा विश्वास ही शिदोरी बापुसाहेबांनी दिली आहे , मुलांना आईकडुन सुसंस्कार ,वडीलांकडुन नवनविन संकल्प/प्रतापांचे धडे तर गुरुकडुन शिक्षण मिळते हि संस्काराची शिदोरी घेवुन संस्थेचे विद्यमान चेअरमन व नगरसेवक ,स्वाभिमानी पलुस शहर आघाडीचे नेते मा ,निलेश भैय्या येसुगडे हे समाजाभिमुख सेवेसाठी व समाजांचे प्रश्नांची सोडवणुकीसाठी तेजस्विता ,तत्परता व तन्मयतेने सर्व युवामित्र व बापुसाहेबांचे जुनेजाणते मार्गदर्शक व त्यांचे आशिर्वाद पाठीशी घेवुन सेवेतआहेत ,समुहाच्या आधारस्तंभ जोत्स्नाताई येसुगडे ,मंगेश भैय्या येसुगडे यांचेसह सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व बापुसाहेबांचे इतकेच आपुलकी , प्रेम व विश्वास हे संस्थेचे भरभराटीस पुरक ठरत आहेत चेअरमनसाहेबांचे संकल्पनेतुन व,संस्थेचे माध्यमातुन विजबिल भरणा ,व्यापारीवर्गासाठी Q ,R Code ,RTGS/NEFT सह आरोग्यसेवेसाठी विमा योजना चालु आहेत,त्या सेवा असंख्य ग्राहकापर्यंत पोहचवणेचे काम संग्राम पतसंस्थेचा विनम्र सेवकवर्ग करत आहे ..           बापुसाहेबांना समाजाचा कळवळा होता त्यापोटी त्यांनी अनेक संकल्प केले ते संकल्प फळासही आले त्यातील संग्राम समुहातील संग्राम पतसंस्था आज जिल्हयातील नावलौकीक प्राप्त संस्था आहे ,बापुसाहेबांचे राजकिय जिवनात संस्थेचे माध्यमातुन केलेली जनसेवेचे फळ म्हणुन जनतेने त्यांना राजसत्तेचे अनेक मुकुट बहाल केले व न्याय दिला ,पलुससारख्या ग्रामिण भागात व शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले बापुसाहेबांना त्यांच्या धर्मपत्नी जोस्त्नाताईची साथही ह्यासमुहाचे वाटचालीत मोलाची ठरली ,बापुसाहेबांचे नाव आज जिल्हाभर एक दुरदृष्टीचा नेता व त्यांनी केलेले कार्य हे समाजाभिमुख असलेची चर्चा ऐकावयास मिळते ,अशा संग्राम पतसंस्थेचे माध्यमातुन सभासदांनी स्वत:व आपले नातलग मित्रमंडळीनी सर्व व्यवहार आपले संस्थेतुन करुन सेवेचा लाभ घ्यावा ,रोपटेचे वटवृक्षात रुपांतर झालेच आहे त्याचे सावलीत सर्वानी विसावा घ्यावा व बापुसाहेबांचे पश्चातही तितकेच प्रेम ह्या समुहावर आहे ते चिरतंन रहावे हि अभिलाषा व्यक्त करतो ,संग्राम पतसंस्थेचे वर्धापन दिनास आपणासर्वातर्फे हार्दिक सदिच्छा..... शब्दाकन :अमृत माने लाडेगांव मो नं  8007929600