Now Loading

महाराष्ट्र महाविद्यालयातील जेईई व एमएचटी-सीईटी परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

निलंगा- एमएचटी-सीईटी परीक्षेत येथील महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगा अंतर्गत महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सन २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. यावेळी महाविद्यालयात या विद्यार्थांचा व पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे हे होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव कोलपुके, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, डॉ. एस.एस. पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक राजेंद्र कटके, सीईटी सेलचे समन्वयक श्रीराम पौळकर हे उपस्थित होते. प्रसाद बोरुळे या विद्यार्थ्यांने जेईई मेन्स् परीक्षेत 99.45 पर्सेंटाईल व जेईई अडव्हान्स्ड् परीक्षेत 141 गुण प्राप्त करुन आयआयटी व एनआयटी साठी पात्र ठरला. पीसीएम ग्रुपमध्ये 90 पर्सेंटाईल पेक्षा अधिक: प्रसाद बोरुळे (99.71 पर्सेंटाईल), संध्याराणी माने (95.82 पर्सेंटाईल), निकीता राठोड (95.47 पर्सेंटाईल), निदा देशमुख (94.30 पर्सेंटाईल), संध्याराणी सावंत (92.90 पर्सेंटाईल), वैष्णवी कानडे (92.76 पर्सेंटाईल), सौरभ जोशी (92.47 पर्सेंटाईल), नम्रता लादे (91.70 पर्सेंटाईल), अभिषेक चव्हाण (91.03 पर्सेंटाईल), लक्ष्मण मसाळे (91.02 पर्सेंटाईल), अस्मिता जाधव (90.00 पर्सेंटाईल) तसेच पीसीबी ग्रुपमध्ये 90 पर्सेंटाल पेक्षा अधिक योगेश सोरडे (98.45 पर्सेंटाईल), सानिया पटेल (98.23 पर्सेंटाईल ), संध्याराणी माने (97.53 पर्सेंटाईल), निखील कुंभार (95.89 पर्सेंटाईल), निकीता राठोड (94.86 पर्सेंटाईल), राजेश्वरी हम्बीरे (92.92 पर्सेंटाईल), प्रेरणा बारतोंडे (91.95 पर्सेंटाईल), अक्षता भोपी (90.40 पर्सेंटाईल) गुण प्राप्त करुन उज्वल यश संपादन केले आहे. यावेळी उपस्थित यशवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कटके यांनी केले. प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालयात सुरु असलेल्या सीईटी सेलची माहिती सर्व विद्यार्थ्यांना करुन दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोलपुके यांनी महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध व्यावसायाभिमुख कोर्सेसबद्दल व सुरु असलेल्या स्पर्धेच्या युगात आपण कसा अभ्यास केला पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. भागवत पौळ यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना मनाची एकाग्रता, संयम, अथक परिश्रम घेऊनच विद्यार्थी यशस्वी होतो असे मत प्रतिपादन केले आहे. प्राचार्य पाटील यांनी पुढे बी.फार्मसी. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेचे समन्वयक दिलीपाराव धुमाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे, संस्था विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शैक्षणिक उणीव भासू देणार नाही अशी ग्वाही दिली. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे यांनी १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनराज मंडले, विजय देशमुख यांनी केले तर आभार राकेश दवणे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुर्यकांत वाघमारे, श्रीकृष्ण दिवे, अमोल पाटील, धनराज मंडले, विजय देशमुख, अनुप पांचाळ, सुनील पाटील, ईस्माइल शिंदे, संजीव कोळेकर, सुरेश गोबाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मा-यांनी परिश्रम घेतले.