Now Loading

भादा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून घरोघरी जाऊन उशिरा पर्यंत लसीकरण सुरू 

औसा: तालुक्यातील भादा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व शासकीय कर्मचारी टीम यांच्याकडून घरोघरी जाऊन रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतमजूर घरी येतात त्यांचे लसीकरण सुरू आहे. सध्या औसा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये 100% लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तर लसीकरण केंद्रावर अनेक नागरिक लसीकरण करून घेत नाहीत यामुळे जे नागरिक दवाखाना किंवा लसीकरण केंद्रावर येत नाहीत अशा नागरिकांना शनिवार दि 30 ऑक्टोबर 2021 रोजी घरी जाऊन त्यां नागरिकाना लसीकरणाचे महत्त्व सांगून लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न भादा प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचारी आणि अशा कार्यकर्त्या यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. या लसीकरण टीम मध्ये आरोग्य विभाग, शाळेतील शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांचा समावेश आहे.