Now Loading

सोलापूर कोल्हापूर व सोलापूर- मिरज या रेल्वे सुरू करा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूरच्या वतीने मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांना सोलापूर येथील रेल्वे डीआरएम कार्यालयात भेटुन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,राहुल अक्कलवाडे यांची उपस्थिती होती. सोलापूर मिरज १ गाडी नंबर २२१५५, सोलापूर कोल्हापूर गाडी नंबर ११०५१ या गाडया गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने बंद करण्यात आलेल्या आहेत. सोलापूर कोल्हापूर व सोलापूर- मिरज या गाडीने प्रवास करणारे भरपुर प्रवासी असून त्यांची गैरसोय होत आहे. तसेच सध्या दिवाळी सण, मंदिरे खुली झाली आहेत. त्यासाठी लोकांची येणे जाणेसाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे लोकांची मागणी देखील आहे. तरी सदर गाडीने प्रवास करणारे लोक हे मध्यम वर्गातील असून त्यांना जास्त पैशाने प्रवास करणे परवडणारे नाही. त्यामुळे वरील दोन्ही गाडया पुर्ववत चालू करून प्रवाशांना सहकार्य करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे. या मागणीला जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.