Now Loading

कोल्हापूर जिल्हा केंद्रप्रमुख , पदवीधर ,शिक्षक व सेवकांची सह.पत. सभासदांना 13% लाभांश देणार

संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांच्या सहकार्याने अल्पावधीतच संस्था नावारूपाला आणली असून सध्या संस्थेच्या तीन कोटी रूपयांच्या ठेवी आहेत तर सभासदांना तेरा टक्के डिव्हिडंट जाहिर करीत असुन यापुढेही सभासदांच्या उन्नतीसाठी झटणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारूतराव चौगले यांनी केले. कोल्हापूर जिल्हा केंद्रप्रमुख , पदवीधर ,शिक्षक व सेवकांची सह.पत.संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय विष्णू पाटील हे होते.