Now Loading

जय शिवराय किसान संघटनेचा वारणा सहकारी साखर कारखाना आणि दत्त शुगरला आंदोलनाचा इशारा

जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने वारणा सहकारी साखर कारखाना व दत्त दालमिया शुगर अआसुर्ले- पोर्ले यांना हार्वेस्टर मशीन ने तोडलेल्या उसातून पाच टक्के मूळी बांधणी वजावट करत आहेत ती चुकीची असून, पूर्ववत एक टक्का करावी, तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी रेखावार साहेब यांनी सर्वच कारखान्यांना ऊस तोडी साठी पूर बाधित उस 40% व चांगला ऊस सात टक्के याप्रमाणे थोडी करायचे आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी त्वरित करावी,यासाठीचे निवेदन देण्यात आले. जर आपण सोमवारपर्यंत याची अंमलबजावणी केली नाही, तर जय शिवराय या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला. यावेळी शिवाजी शिंदे, शितल कांबळे, राजाराम थोरवत, राजेश पाटील,बंडा पाटील, अशोकराव पाटील, सुनील पाटील, युवराज आडनाईक, बाबासो पाटील आदी उपस्थित होते.