Now Loading

औसा येथे परिवहन महामंडळ यांच्या वतीने विविध मागण्या साठी आंदोलन

औसा: दि.30 - आगारातील सर्वसामान्य कर्मचारी यांच्या वतीने दि. 27 आक्टोंबर 2021 पासुन महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सर्व संघटना कृतीसमीतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे तसेच -कर्मचान्याच्या प्रभवित मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाचें राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी सर्व कामगारांची संपास पूर्ण पाठिंबा दिला पण कृती समीतीने कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे या बाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व सामान्य कर्मचा-यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी आहे. तरी दि..20 आक्टोंबर 2021 पासून कर्मचाऱ्यांत शासकीय सेवेत विलीनीकरण होण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी रा..प. कर्मचारी ही म्हणून संघटना विरहीत आम्ही औसा आगारातील सर्व कर्मचारी सध्या करणार शांततेत व संवेदशील मार्गाने बेमुदत संप पुकारत आहोत.तरी या बाबत कायदा व सुव्यवस्था यासाठी सर्व सामान्य रा. प. कर्मचाऱ्यां मार्फत आपणास निवेदन सादर केले आहेत. यावेळी या निवेदनावर औसा आगारातील दिक्षित जी व्ही,गवळी एस एम, पवार वाय टी,येलगुडे डी जी, सुर्यवंशी व्ही के, गिरी आर डी,कदम एस एम, सोळुंके जी व्ही, पांचाळ एस आर आदि कर्मचारी उपस्थित होते.