Now Loading

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज बुलढाणा जिल्ह्यात

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज 31 ऑक्टोंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथून खाजगी हेलीकॉप्टरने चिखलीकडे प्रयाण, दु. 1 वा चिखली येथे श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व डॉ. आशुतोष गुप्ता यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, दु 2 वा रानवारा मंगल कार्यालय, गुप्ता गार्डन, जाफ्राबाद रोड चिखली येथे दि. चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक लि. चिखली द्वारे आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती, दु. 3.30 वा रानवारा मंगल कार्यालय येथून मोटारीने श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅडकडे प्रयाण, दु. 3.45 वा श्री. अंबिका अर्बन को. ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी हेलीपॅड येथे आगमन व खाजगी हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.