Now Loading

युवक काॅंग्रेसच्या वतीने ‘‘भव्य षिवकालीन किल्ले बनाओ’’ स्पर्धेचे आयोजन ....मोठया संख्येने सहभागी होण्याचे युवक काॅंग्रेसचे आवाहन

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचा इतिहास व गडकिल्ल्यांचे बीज छोटया-छोटया बालमित्रांच्या मनामध्ये रुजावे यासाठी खामगाव येथील माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने दिवाळी सणानिमित्त खामगांव शहरातील नागरिकांकरीता ‘‘भव्य मातीचे शीवकालीन किल्ले बनाओ स्पर्धेचे’’ आयोजन करण्यात आले आहे. आजच्या लहान पिढीला छत्रपती शीवाजी महाराजांचा इतिहास जवळुन अनुभवता यावा या करीता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांबदद्ल आवड व ओढ निर्माण व्हावी तसेच मोबाईल,टीव्ही गेम मध्ये रमलेल्या मुलांना आपल्या आवडत्या शिवरायांच्या इतिहासाची माहिती होऊन वास्तवातील प्रत्यक्ष खेळांची आवड व्हावी म्हणून व त्यांच्या कलागुणांना वाव देता यावी, व तरुणांमध्ये असलेल्या किल्ले संवर्धनाबदद्ल जाणीवेला योग्य दिषा लाभावी म्हणून हा प्रयत्न असून दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रथमच ही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी फी नाममात्र 10 रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांना 30 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदणी करणाऱ्यालाच या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.नोंदणी झालेल्या सर्व स्पर्धकांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येईल. त्या ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपण बनविलेल्या किल्ल्याचा फोटो टाकावा व सोबत आपले नाव व पत्ता मोबाईल नंबर आवश्य टाकावा. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे प्रत्यक्ष तपासणी तज्ञ कलाशीक्षका कडून करण्यात येईल. स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 5,555/- रुपये, द्वितीय क्रंमांकाचे 3,555/- रुपये, तृतीय क्रमांकाचे 2,255/- रुपये अशी रोख स्वरुपाची बक्षीसे दिली जाणार आहे.स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र सुध्दा दिले जाणार आहे. तरी 20 वर्षा आतील सर्व स्पर्धकांनी मातीचे‘‘भव्य शीवकालीन किल्ले बनाओ’’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले असून स्पर्धेत भाग घेणार्यांनी नाव नोंदणीसाठी खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे मो.नं.9850801009,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने मो.नं.9822413113,नगरसेवक किशोरआप्पा भोसले मो.नं.9822709298,पंकज गिरी मो.नं.9404808030,मयुर हुरसाड मो.नं.9168030055, अमित भाकरे मो.नं.7020817711,समाधान लोढे मो.नं.9881312827,भुशण षिंदे मो.नं.8669152424, देवा गावंडे मो.नं.9096583123, पंकज सातव मो.नं.9850053004, तुषार चंदेल मो.नं.8055604020, रोहित राजपूत मो.नं.7588074747,प्रितमभाउ माळवंदे मो.नं.9822355767, शुभम मिश्रा मो.नं.8552930138, सुरेंद्र पवार मो.नं.9850319992,रामाभाउ लाहुडकार मो.नं.9960778090,आनंद किलोलीया मो.नं.9922390771, मुन्नाभाऊ बोंद्रे मो.नं.9975925325,केषवभाउ कापले मो.नं.9820200947, मनीष केवारे मो.नं.9604671283,पिंटुभाउ जाधव मो.नं.9834747282,महानंद यादव मो.नं.7720004240, अजय ताकवाले मो.नं.9422883803, अजय निळे मो.नं.9850565353 यांच्याशी संपर्क साधावा.