Now Loading

कोरोना साथ रोगाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करुन घ्या - माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

खामगाव:- कोरोनाचा धोका अजुनही टळलेला नाही. अनेक देषांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले असून कोरोना पॉझिटीव्हची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. भारतामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण केले जात आहे. कोरोना लस ही नागरिकांसाठी सुरक्षा कवच आहे.म्हणून संभाव्य धोका ओळखून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. दि.25 ऑक्टोंबर 2021 रोजी जलमित्र माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराश्ट षासनाच्या मिषन कवच कुंडल अभियानांतर्गत प्रभागक्रं.11 मधील श्री षिवाजी व्यायाम मंदिराच्या प्रांगणामध्ये कोरोना लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.