Now Loading

उजेड येथे पत्रकार शकील देशमुख यांचा सत्कार; न्यायाधिश ए.एन.एल शेख यांची उपस्थिती.

शिरूर अनंतपाळ :- मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार शकील रसुलसाब देशमुख उजेडकर यांना मिळाल्याबद्दल न्यायाधिश ए.एन.एल शेख व डी.आर. कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुक्यातील उजेड येथे आयोजित विशेष कार्यकृमात तंटामुक्ती अध्यक्ष संजय बिराजदार यांच्या पुढाकाराने हनुमान मंदिरात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच हमीद पटेल हे होते.तर व्यासपिठावर न्यायाधिश ए.एन.एल शेख,न्यायाधिश डी.आर. कुलकर्णी, तहसीलदार अतुल जटाळे, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, पोलिस निरिक्षक अंगद सुडके, अॅड.सुहास मादलापुरे,अॅड. ज्ञानेश्वर जळकोटे, अॅड.एस. एम. कांबळे, अॅड. विनोद कांबळे, माजी जि.प. सदस्य ऋषीकेश बद्दे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय बिराजदार, उपसरपंच सौ.सुमित्राबाई सगर, ग्रामविकास अधिकारी एच.टी. राठोड,महेबुब बेग,गोविंद मलवाडे, दयानंद चिमणशेट्टे यांसह ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.