Now Loading

एमआयएम नेते खासदार असदुद्दीन ओवेसी लवकरच सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्‍तेहादुल मुसलिमीन पार्टीच्या वतीने पक्षाचे सर्वेसर्वा खासदार ओवेसी यांच्या उपस्थितीत0 औरंगाबाद येथे बैठक घेण्यात आली. या बैठकिला खासदार इम्तियाज जलील प्रदेश कार्याध्यक्ष आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, आमदार फारुक शाह, वारिस पठाण, मोईन सय्यद यासह मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र,कोकण व मुंबई विभागातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीस संबोधित करताना सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि यांनी येणाऱ्या काळात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एम आय एम पक्ष हा प्रमुख पक्ष म्हणून गणला जाईल अशी ग्वाही दिली. तसेच शाब्दी यांनी आपल्या केलेल्या कामाची माहिती देत येणाऱ्या महानगरपालिकेत पक्ष कोण कोणत्या ठळक मुद्द्यावर सोलापूर मध्ये निवडणूक लढवणार याची माहिती दिली व पक्षाचा जाहीरनामा खासदार ओवेसी यांच्यासमोर सादर केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी करा माझा व माझ्या टीमचा सोलापूरकडे विशेष लक्ष आहे. कोणी पार्टी सोडून जात असेल त्याकडे लक्ष देऊ नका पक्ष वाढीवर लक्ष देवून तुम्ही कामाला लागा.अशा सूचना दिल्या.