Now Loading

रस्त्यांवरील खड्डे दिवाळी पूर्वी प्रकाशमान रा यू कॉ चे अनोखे आंदोलन

रस्त्यांवरील खड्डे दिवाळी पूर्वी प्रकाशमान रा यू कॉ चे अनोखे आंदोलन एक दिवा खड्ड्यासाठी अकोट - गेल्या अनेक दिवसापासून शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी अनेक रस्त्यावर खड्डे निर्माण झालेले आहेत़. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे बूजवीन्यात यावे. नागरिकांना रस्ते सुविधा नगर पालिकेने द्यावी या साठी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ने खड्डा तेथे दिवा लावून खड्डे समस्यांवर प्रकाश टाकला. दिवाळी पूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील खड्ड्यावर दिवे लावून रा यु कॉ ने अनोखे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत़. या खड्ड्यामुळे वाहनधारकांना व पादचारी नागरिकांना त्रास होत आहे. अनेकदा वाहनधारकांचे अपघात झाले व होत आहेत़. त्यामुळे शारीरिक इजा होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्गांवर मोठाले खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे घराच्या बाहेर निघताना बाहेरून घरी जाताना आपण शाबूत राहू काय की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षांच्या कार्यकाळात अजूनही अनेक रस्त्यांची खड्डे समस्या मिटवली नाही. या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आजचे आंदोलन जनहितासाठी केले असे यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी सांगितले.आहे. शहरातील जिजामाता चौक येथून प्रारंभ झालेले हे दिवे लावा आंदोलन शिवाजी चौक, सोनू चौक मार्गे नरसिंह रोड या रस्त्यांवर करण्यात आले.या आंदोलनामुळे एक दिवा रस्त्यावरील खड्ड्यांसाठी शहराच्या विकासासाठी असे चित्र रस्त्यांवर दिसून आल्यामुळे नगर परिषदेची उदासीनता दूर होईल अशी अपेक्षा नागरीकाना आहे. मात्र अनेक दिवसांपासून नगरपरिषदेला हे खड्डे दिसत नाहीत काय असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यांचे स्वरूप बदलावे सुविधांनी युक्त रस्ते नागरिकांना मिळावे हाच आजच्या आंदोलनाच्या मागचा उद्देश दिसून आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत पुढाकार घेतलेला आहे. या आंदोलनानंतर प्रशासनाच्या डोळ्यात उजेड पडावा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदैव तत्पर राहील असेही रा यू कॉ. अकोट तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी यावेळी म्हटले.हे आंदोलन रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, रा. यु.काँ.चे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ मोहोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी अकोट रा.यू. कॉ. तालुकाध्यक्ष राम म्हैसने ताज राणा, रियासअली देशमुख, संदेश घनबदुर, साजिद खान, जयदीप सराटे, विपुल ठाकरे, वैभव पोटे, प्रफुल म्हैसने, सय्यद जमीर, शिवा गावंडे, सुशील लकडे, गौरव पडोळे, अनिकेत सिरस्कार, अक्षय रावणकार, ऋषिकेश गावंडे, श्याम वाघ, अक्षय भावे, प्रफुल गिरी, प्रफुल इंगोले, मोहन ठाकरे, निलेश म्हैसने, मयुर बरबरे, शुभम देशमुख, अब्दुल कलाम, सौय्यद जमीर, सैं जमिर, अब्दुल नवशाद, अफजल खान, सुमित खांडे, पवन मालोकार, राजेंद्र वळसे, पवन गोंडचावर, अक्षय बोंद्रे, विठ्ठल शिंगणे,प्रतीक इंगळे, अवि बोरकर, ज्ञानू कोरफळे, गोपाल सावके, प्रकाश कुटे, किशोर लोखंडे,प्रथमेश सोळुंके, अजय भांबुरकर, निशांत लोखंडे, शिवा पोटे, गौरव ढेपे, अक्षय हिवराळे, ज्ञानू खोंड, अंकित हापसे, प्रज्वल रेवसकार व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते