Now Loading

मजुरीचे दर वाढले, शेतकरी चिंतेत

बुलढाणा जिल्ह्यात पावसाने गेल्या दहा, पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपाची सर्व कामे एकाच वेळी आल्यामुळे मजुरांची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे कापूस वेचणे १२ रुपये किलो, सोयाबीन सोंगणी ३ हजार रुपये प्रतिएकर, मका सोंगणे ४ हजार रुपये प्रतिएकर याप्रमाणे भरगच्च मजुरीचे दर शेतकरीवर्गाला नाइलाजास्तव द्यावे लागत असल्याने मजुरांना अच्छे दिन आले आहेत. सध्या कापूस वेचणी जोमात सुरू असून, १२ रुपये प्रतिकिलोप्रमाणे एक महिला कमीत कमी ६० किलो कापूस वेचत आहे. यामुळे मजुरांचे अच्छे दिन, तर शेतकरी आर्थिक अडचणीत मारले आटेन