Now Loading

कोविडने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मिळणार ५० हजार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश सर्वोच्चन्यायालयाने दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांतून पात्र प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी, तर सचिवपदी जिल्हा शल्यचिकित्सक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होते. अनेकांना ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नव्हते. दोन्ही लाटेत जिल्ह्यातील ६७४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारकडून ही मदत देण्यात येणार आहे. जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असून जिल्हा शल्यचिकित्सक हे या समितीचे सचिव राहणार आहेत.