Now Loading

ऐन दिवाळीत बँकेमध्ये कैश तुटवडा

ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यती पळशी बु. येथील भारतीय स्टेट बैंक शाखेत कॅशचा तुटवडा असल्याने ३० ऑक्टोबर रोजी दिवसभर बँकेचे व्यवहार बंद पडले.मी त्यामुळे बैंक ग्राहकांची गैरसोय झाली. खामगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर येत असलेल्या पळशी बु. येथे भारतीय स्टेट बँक शाखा आहे. या शाखेंतर्गत एकूण १० गावे येत असून, दहा गावांत जवळपास तीन हजार बैंक खातेदार आहेत. या बँकेत एक शाखा अधिकारी व दोन क्लर्क असे तीन कर्मचारी कामकाज पाहात होते. मात्र, यातील एका कर्मचाऱ्याची ३१ जुलै २०२१ रोजी अकोला येथे बदली झाली. सध्या तीन महिने उलटून गेले, तरी त्यांच्या जागी कोणी कर्मचारी बँकेने दिला नसल्यामुळे येथे दोन कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ होत आहे. ३० ऑक्टोबर रोजी बँकेत पैशाची कमतरता पडल्यामुळे एक कर्मचारी कॅश काउंटर बंद ठेवून मुख्य शाखा खामगाव येथे कॅश अणण्यासाठी गेले असता सायंकाळी ४.४५ वाजताच्या दरम्यान कॅश घेऊन बँकेत आले. आजूबाजूच्या गावातील ग्राहकांना दिवसभर पैसे काढण्यासाठी तासन्तास बँकेत ताटकळत बसावे लागले. अनेक खातेदार पैसे न मिळता घरी परत गेले. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसात पैसे मिळत नसल्यामुळे बैंक ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. ग्राहकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.मी पळशी बु. या गावालगत अनेक गावे असल्याने कधीकधी बँकेत गर्दी होते. या शाखेत पळशी बु,पळशी (खुर्द), कदमापूर, लोणी, दस्तापूर, उमरा, लासुरा, हिंगणा (घोंगे) शेंद्री, संभापूर यासह परिसरातील अनेक गावांतील जुन्या खातेदारांची गैरसोय होत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैंक ग्राहकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी भूमी मुक्ती मोर्चा या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण ठोसरे यांच्यासह या परिसरातील बँक खातेदारांकडून होत आहे.