Now Loading

शिराळा तालुक्यात विपश्यना केंद्र उभारणार

शिराळा तालुक्यात विपश्यना केंद्र उभारणार... S NEWS                 चिंचोली ता. शिराळा जि.सांगली याठिकाणी शिराळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तालुक्यांमध्ये विपश्यना केंद्र उभारणार असल्याची माहिती देण्यात आली.. या केंद्राचा शिराळा तालुक्या बरोबरच  परिसरातील तालुक्यांनाही ध्यानधारणा करण्याची संधी मिळणार आहे. त्याकरिता हे केंद्र उभारण्यासाठी सर्वजण शक्तीचे प्रयत्न करत आहेत. आयु.प्रकाश बोरसे ( विपश्यनाचार्य) पुणे, आयु.संजय भोसले ( कराड ) आयु.नथु कांबळे(मुंबई) यांच्या मोलाच्या सहकार्यातून हे केंद्र उभे रहाणार आहे.. मा. सुनील घोलप यांनी बैठकीचे नियोजन केले. डॉ.संदीप कांबळे,  डॉ.रोहित वाघमारे ,  मा.वैभव वाघमारे ,  डॉ.विनोद झाडे,           अजय एटम,भारत मोहीते, हरीश काळे , सुरेश घोलप इ.कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते...  भविष्यकाळात विपश्यना केंद्र उभारण्याकरिता शिराळा तालुक्यातील विविध संघटनेत काम करणाऱ्या धम्म बांधवांनी या विपश्यना केंद्रासाठी सहकार्य द्यावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले....