Now Loading

सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती : भारताचे पहिले गृहमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना प्रशासनाकडून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, महसूल सहायक देस्तेवाड, भाऊसाहेब सोनवले व कर्मचारी उपस्थित होते