Now Loading

होमगार्ड सोशल मीडिया वर अश्लील शेरेबाजी बाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल

एका मित्राच्या घरी आरोपीचे येणे-जाणे होते त्याच्यातून आरोपीचे मित्राच्या पत्नीसोबत एक-दोन वेळा संवाद झाला होता सदर आरोपीने मित्राच्या पत्नी चा मोबाईल क्रमांक मिळवला व सदर मोबाईल क्रमांकावर सोशल मीडियाच्या मदतीने अश्लील शेरेबाजी केली तसेच सदर महिलेचा फोटो मिळून सदर फोटो मध्ये छेडछाड केली व सदर फोटो बदलून अश्लील इमेज तयार करून सदर महिलेला पाठवले सदर महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे मेसेजेस पाठवले सदर महिलेने पोलिस ठाण्याला तक्रार करताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र हलवले सदर मोबाईल क्रमांक बंद असतानासुद्धा सायबर सेल कडून माहिती घेऊन आरोपी अभिजीत विजय हटकर राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे आरोपी निष्पन्न केला विशेष म्हणजे सदर चा आरोपी हा होमगार्ड आहे. सदर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला सदर आरोपी चा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे तो सायबर फॉरेन्सिक लॅब ला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे यापुढे सुद्धा बारामती शहर पोलीस ठाण्यात तर्फे महिलांच्या प्रश्नांना अग्र क्रमांक देऊन ते तात्काळ सोडण्यात येणार आहेत तसेच कोणत्याही महिलेची छेडछाड किंवा तिच्यावर शेरेबाजी यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ ओमासे पोलीस नाईक किरण कदम व अतुल जाधव यांनी केलेला आहे.