Now Loading

एटीएम फोडणारा चोरटा जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सिन्नर ।  माळेगाव औद्योगिक वसाहत परिसरातील बँक आँफ ईंडीयाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.31) अटक केली आहे.          19 ऑक्टोबर रोजी रात्री 2  वाजता माळेगाव औद्योगिक वसाहतीतील भगवती स्टील कंपनीच्या शेजारील बँक आँफ ईंडीयाचे एटीएम फोडन्याचा प्रयत्न झाला होता. त्यात एटीएम मशिनचे मोठे नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे  पथक तपास करत असतांना पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीसारखा एक ईसम माळेगाव येथील अनिकेत बियर शाँपी येथे आल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, हवालदार रविंद्र वानखेडे, प्रितम लोखंडे,  विनोद टिळे, हेमंत गिलबिले ,  प्रदीप बहीरम, किरण काकड, संदीप लगड यांनी माळेगाव परीसरात जावुन त्याला ताब्यात घेतले.  त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारांचे मदतीने एटीएम फोडल्याचे कबुली दीली. पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेवुन नांदुरशिगोंटे सिन्नर येथुन त्यांना ताब्यात घेतले आहे.