Now Loading

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‍साजरी

भारताचे पहिले गृह मंत्री व उपपंतप्रधान वल्लभ भाई पटेल यांची जयंती खामगाव येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय खामगांव येथे साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश सोशल मिडीया सहसंयोजक सागर फुंडकर आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरदार वल्लभभाई पटेल प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पार्पण करुन अभिवादन केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष गजानन राव देशमुख, डॉ एकनाथ पाटील, जितेंद्र पुरोहित, नरेंद्र शिंगोटे, माधवराव कांबळे, नगेंद्र रोहणकार, शेखर कुळकर्णी, सत्यनारायण थानवी, सुभाष इटनारे, संजय शर्मा, आशिष सुरेका, सोनू नेभवानी,रोहन जैस्वाल,प्रसाद ऐदलाबदकर,योगेश कोल्हे यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.