Now Loading

कृषीपंपांसाठी दिवस-रात्र भारनियमन जाहीर

गेल्या काही वर्षात भारनियमनापासून सूट मिळाल्यानंतर यावर्षी पुन्हा आता भारनियमन केले जाणार आहे. त्यामुळे विहिरी, बोअरमध्ये पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी न देता येण्याची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकणार आहे. त्याचा परिणामही बागायती पिकांवर होणार आहे. दरम्यान, खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारनियमनाचे वेळापत्रक महावितरण कंपनीने जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांत घरगुती आणि कृषिपंपांना वीजपुरवठा करताना भारनियमनाचे चांगलेच चटके शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सहन केले. त्यातून सुटका होत नाही तर आता नव्याने भारनियमन करण्याची तयारी महावितरणने केली आहे. त्याचा सामनाही आता करावा लागणार आहे. या वेळेत होणार भारनियमन अटाळी उपकेंद्रांतर्गत ११ केव्ही शिला व लाखनवाडा फिडरमध्ये सोमवार ते बुधवार रात्री १०.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत तसेच गुरुवार ते रविवार या दिवशी सकाळी ७.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत भारनियमन होणार आहे. तर बोरी अडगाव, विहिगाव फिडरमध्ये सोमवार ते बुधवार या दिवशी सकाळी ७.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत, तर गुरुवार ते रविवार या दिवशी रात्री १०.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत भारनियमन केले जाणार आहे.