Now Loading

जिल्ह्यातील बाजार समित्या सहा दिवस बंद !

दिवाळीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी सोमवारी बाजार समिती सुरू होणार आहे. खामगाव बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीत बुलडाणा जिल्ह्यातील तसेच अकोला जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. दिवाळीनिमित्त बाजार समिती १ ते ६ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. यावर्षी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली. दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरी शेतमाल आहे.