Now Loading

बायोफ्यूएल' पंप, किरकोळ विक्री केंद्रांना लावले सील!

' ज्वलनशील (बायोफ्यूएल- डिझेल) पदार्थविक्रीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या १२ परवानग्या तीन दिवसांत सादर करा, अशी नोटीस देत खामगाव, शेगाव तालुक्यातील बायोफ्यूएल पंप, किरकोळ विक्री केंद्रांची तपासणी करून ते सील करण्याची कार्यवाही महसूलविभागाच्या पथकांनी रविवारी केली. राज्यात बायोडिझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री धोरण शासनाने ११ मे २०२१ रोजी निश्चित केले आहे. त्यानुसार यापैकी कोणताही व्यवसाय करावयाचा असल्यास संबंधितांना विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने परवानग्या आहेत. त्या असल्याशिवाय बायोडिजल, फ्युएल विक्री करता येत नाही, असे शासनाने म्हटले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल तक्रारीनुसार शासनाने ठरवून दिलेल्या विविध बाबींची तपासणी करण्यासाठी खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी महसूल विभागाच्या पथकांची नियुक्ती करत खामगाव. शेगाव तालुक्यात रविवारी एकाच दिवशी तपासणी केली. उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात विविध पथकांनी तपासणी केली. तसेच खामगावात तहसीलदार अतुल पाटोळे, शेगावात तहसीलदार समाधान सोनोने, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्यासह दोन्ही तालुक्यातील ठाणेदार सहभागी होते.