Now Loading

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार अतिवृष्टीची मदत

पावसाळ्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी दिला असून बुलढाणा जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये एकट्या खामगाव तालुक्यातील ९ हजार ३१४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी ९ कोटी ८ लाखाचा निधी खामगाव तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या निधीचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी केले जाईल, असे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले. यावर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिके गेली. तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टी, पूर व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी आणि सर्वे करून पंचनामे करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने तातडीने मदत निधी म्हणून रक्कम जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे.