Now Loading

सोयाबीन कापसाच्या भावासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला एल्गार सोयाबीन ला 8 हजार आणि कापसाला 12 हजार भाव मिळण्याची मागणी मोर्चा ची दखल न घेतल्यास 12 नोव्हेंबर पासून राज्यभर आंदोलन पेटेल - तुपकर

* बुलढाणा : राज्यातील सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढून सरकारला यामाध्यमातून इशारा देण्यात आला आहे... या एल्गार मोर्चा मध्ये बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते... अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती संपूर्ण राज्यभर निर्माण झाली आहे, आणि त्यावर शासनाने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल 8 हजार रुपये तर कापसाला प्रति क्विंटल 12 हजार रुपये भाव द्यावा, सोयाबीन आयात थांबवावी, पामतेल आणि खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन खंडित करणे देखील थांबवावे यासह इतर मागण्यांसाठी आज हजारो शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला, चिखली रोड वरील मोठी देवी मंदिरापासून एल्गार करत संपूर्ण शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले... सदर मागण्या 11 नोव्हेंबरपर्यंत शासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा 12 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यभर सोयाबीन आणि कापसाचे आंदोलन पेटणार असून शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत. असा इशारा देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे...