Now Loading

मंत्री आदित्य ठाकरे यांनी साधला आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद

संगमनेर : येथील एसएमबीटी सेवाभावी संस्था संचलित कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेस भेट देत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मंत्री आदित्य ठाकरे रविवारी एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांनी पर्यावरणाबाबत प्रश्नही विचारले. प्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते.