Now Loading

दिल्ली: टिकरी सीमेवर दुचाकी आणि रुग्णवाहिकांसाठी रस्ता उघडला

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान 11 महिन्यांपासून बंद असलेली टिकरी सीमा उघडण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवरील बॅरिकेड्स आणि सिमेंट बॅरिकेड्स हटवले आहेत. त्याचवेळी दिल्ली पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या करारानंतर टिकरी सीमेपर्यंत जाणारा छोटा रस्ता खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली आणि हरियाणातील जनतेला फायदा झाला आहे. आज दुपारपासून टिकरी सीमेवरील ५ फुटी रस्ता खुला करण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने आणि रुग्णवाहिका ये-जा करू शकतील.