Now Loading

तळेगाव डवला बस थांब्यावर आरोपीच्या ताब्यातून गोवंश मांस जप्त

तळेगाव डवला बस थांब्यावर आरोपीच्या ताब्यातून गोवंश मांस जप्त तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा पोलिसांनी मिळालेला गुप्त व खात्रीलायक माहितीच्या आधारे ग्राम तळेगाव डवला बस थांब्यावर मोटारसायकलने गोवंश मांस विक्रीकरिता घेऊन जाणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडून आरोपीस अटक केली आहे 50 किलो गोवंश मांस किंमत दहा हजार रुपये व मोटारसायकल किंमत 50 हजार रुपये असा 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आरोपीस अटक केली असून पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीसी गणेश सोळंके करीत आहेत