Now Loading

आर्णी तहसीलवर भाजप चा मोर्चा

शेतकऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे भाजपा आर्णी तालुका च्या वतीने १ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नेतृत्व केले. राज्य सरकारने ओला दुष्काळाची घोषणा करावी, प्रति हेक्टरी ५० हजाराची शेतकऱ्यांना मदत द्यावी, विम्याची राशी सरसकट द्यावी, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणेनुसार ५० हजार मदत तातडीने द्यावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. यावेळी आमदार निलय नाईक, आमदार संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, उद्धवराव येरमे, दिनकर पावडे, राजाभाऊ पडगिलवार, यांचेसह भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होते.