Now Loading

आयकर विभागाचा छापा नसून खात्यांची चौकशी - राधेश्याम चांडक खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित

बुलढाणा : मागील पाच दिवसांपासून बुलढाणा अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये मागील पाच दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाकडून चौकशी सुरू होती यामध्ये अनेक अफवा ही पसरविण्यात आल्या होत्या मात्र आयकर विभागाचा तो छापा नसून खात्यांची रुटींग चौकशी असल्याची माहिती बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली संस्थेच्या खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून नावाजलेले बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट संस्थेच्या बुलढाणा येथील मुख्य शाखेमध्ये मागील चार-पाच दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी सुरू होती यासंदर्भात काहीजणांनी छापा पडल्याचे अफवा पसरविली मात्र बुलढाणा अर्बन संस्थेवर आयकर विभागाच्या कुठल्याही प्रकारचा छापा नसून काही नावांच्या घ्या त्यांची नियमित चौकशी असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी याबाबत युसीएन शी बोलताना सविस्तर माहिती दिली. या काळामध्ये खातेदारांचा विश्वास कमी झालेला नसून उलट ठेवी वाढलेल्या आहेत त्यामुळे खातेदाराने कुठलीही शंका न बाळगता असलेला विश्वास वृद्धिंगत करावा असे आवाहन ही चांडक यांनी केले