Now Loading

एक रकमी एफआरपीसाठी फलटण तालुक्यातील ४ साखर कारखाने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना शेतकर्‍यांचे मोटार सायकल रॅली काढून निवेदन

फलटण : ऊस उत्पादक शेतकरी यांचा गाळपासाठी शेतातून तुटून जाणाऱ्या ऊसाला एक रकमी एफआरपी मिळावी या प्रमुख मागणीसाठी एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत मोटार सायकल रॅलीने जावून फलटण तालुक्यातील ४ कारखाने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना एक रकमी एफआरपी देणेबाबतचे निवेदन देण्यात आले.    आज सोमवार दि. १ नोव्हेंबर रोजी फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी याबाबतचे निवेदन दिले.  यामध्ये श्रीराम जवाहर उद्योग फलटण श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे व प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील, व्हाईस चेअरमन नितीन भोसले व संचालक संतोष खटके यांना निवेदन दिले. शरयू इंडस्ट्रीज लिमिटेड कापशी  विभागीय कार्यालय फरांदवाडी ता. फलटण येथे अधिकारी यांना निवेदन दिले. स्वराज इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचे निवेदन  पुजारी व प्रदीप मोहिते यांना दिले. श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी कारखान्याचे विभागीय कार्यालय वाजेगाव ता. फलटण येथे अधिकाऱ्यांना निवेदन दिले तर फलटण  प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, फलटण तहसीलदार समीर यादव यांना निवेदन दिले.  निवेदनात शासन स्तरावर एफआरपी एक रकमी देणे वाहतूकदारांना दरवाढ देणे व वीज पंप धारकांची बिले परस्पर ऊस बिलातून कपात न करणे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.  फलटण तालुक्यातील सर्व कारखान्यांचे चेअरमन कार्यकारी संचालक विभागीय कार्यालयातील अधिकारी यांनी एफ आर पी एकरकमी देणेबाबत लवकरच निर्णय घेवू असे आश्वासन दिले आहे.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने बजरंग खटके तानाजी गावडे  पै.श्री बजरंग गावडे विश्वास दादा गावडे बाळासाहेब गावडे संजय वरे शिवाजी शेडगे, प्रमोद गाडे योगेश गावडे विलास मिंड रोहन गावडे अमित खटके विलास सारंग सत्यजित खटके, रतन तात्या गावडे दिलीप रणवरे रुपेश मिंड पाटील रमेश दादा गावडे गणेश कापले सचिन खटके यांनी रॅलीत सहभाग घेतला.