Now Loading

सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्री दत्त इंडिया' साखरवाडी कारखाना बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

फलटण : साखरवाडी ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रा. लि. कारखान्याच्या  ३ र्‍या सन २०२१ - २०२२ सालच्या  गळीत हंगामाचा  बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज सोमवार दि. १ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. साखरवाडी ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रा. लि. या कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री महाराज अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कारखान्याचे संचालक जितेंद्र धरु, चेतन धरु, परीक्षीत रुपारेल, कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजित जगताप उपस्थित होते.   समारंभास  फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर व रेश्मा भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सागर कांबळे, संजय भोसले, रमेश बोन्द्रे, युनिटी बिल्डटेकचे नाईक निंबाळकर साखरवाडी व फलटण तालुका परिसरातील शेतकरी, राजकीय कार्यकर्ते व कर्मचारी यांच्या उपस्थित होते.