Now Loading

पातुर्डा बु. येथील बँकेला भाजपने कुलूप ठोकले

बुलढाणा : पातुर्डी बु येथील सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखेला भारतीय जनता पक्षाच्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. मागील पंधरा दिवस अगोदर पातुर्डी बु सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेला शॉर्ट सर्किटने आग लागली. तेव्हापासून बँक बंद आहे. वरिष्ठ अधिकारी फिरकायला तयार नाहीत. शेतकरी, शेतमजूर, निराधारांना ऐन दिवाळीच्या सणाला चकरा माराव्या लागत आहेत. पक्ष पदाधिकारी यांनी संबंधित विभागांच्या अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सोमवारी बँक सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु बँक व्यवहार बंदच असल्याचे निदर्शनास येताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. शाखेला कुललप ठोकले. यावेळी भाजपा संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश राठी,रामदासम्हसाळ, सुनील मेंहगे,संजय मेंहगे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते खातेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.