Now Loading

डेंग्यू, मलेरिया पसरतोय पाय १९१४ घरांमध्ये आढळली डासअळी : एक दिवस कोरडा पाळण्याची गरज

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असताना डेंग्यू पाय पसरत असल्याचे चित्र आहे.र ष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत सर्वेक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये २५ हजार ८६२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १९१४ घरांमध्ये डासअळी आढळली. तसेच २३८८ भांड्यांमध्ये डास अळी आढळली आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे पावसाळा संपल्यानंतर घरावरील रिकामे टायर,भाड्यांमध्ये पाणी साचते. या पाण्यात डासांची निर्मिती होऊन डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विशेष डेंग्यू सर्वेक्षण कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील डासअळीकरिता २४ हजार ४३३ घरांची तपासणी करण्यात आली. ६७ हजार २१ भांड्यांची तपासणी केल्यानंतर २ हजार ३८८ भांड्यांमध्ये डासअळी आढळली. तसेच अनेक ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी साचलेले भांडे आढळले. -----------------------------------