Now Loading

घरगुती सिलिंडरचा स्फोट ; चौघे जखमी

बुलढाणा ; संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथे २ वाजेच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण गंभीर जखमी झाले. काकनवाडा येथे रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटात श्रीकृष्ण उगले, गोपाळ उगले, रवी इप्परकर, राहुल इप्परकर हे चौघे जखमी झाले. या सर्व जखमींना तातडीने वरवट येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या सर्वांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले. तसेच घराचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या पूर्वी घरावरील छत उडाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने तलाठी कुसळकर यांनी केला. घटनास्थळी माजी जि.प. उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी भेटदिली. आग विझविण्यासाठी उगले कुटुंबाला शेजारील रहिवासी मदतीला धावून आले.