Now Loading

पारगाव शिंगवे येथें अवैध दारू धंद्यावर कारवाई

पारगाव शिंगवे येथें मंचर पोलिसांची कारवाई पारगाव शिंगवे येथे हॉटेल रानवारा मध्ये अवैधरित्या दारूची विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून दारू विक्री करणारा दीपक जयवंत सुरोशे सध्या रा. पारगाव शिंगवे ता.आंबेगाव पुणे मूळ रा.उमरोली ता.मुरबाड जि. ठाणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद पो.कॉ. सुदर्शन माताडे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंचर पोलीस ठाण्याचे सपोनि कांबळे यांना गुप्त बातमी दारा मार्फत पारगाव शिंगवे गावच्या हद्दीत हॉटेल रानवारा येथे अवैध रित्या दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी या बाबत पोलीस स्टाफ यांना पंच घेऊन सदर ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. पोलीस स्टाफ हॉटेल रानवारा येथे गेले असता त्या ठिकाणी काउंटरवर एक इसम दारू विक्री करत होता. पोलिसांनी त्याला नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक जयवंत सुरोषे आहे असे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणावरून 2,640 रु दारू जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.