Now Loading

वसुबारस व गो-पूजन उत्सव उत्साहात

संगमनेर : संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ व जिजामाता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मालदाड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित 'वसुबारस व गो-पूजन उत्सव' कार्यक्रम राज्य महानंदाचे अध्यक्ष तसेच राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे आयोजित 'वसुबारस व गो-पूजन उत्सव' कार्यक्रमासाठी श्री. गणपतराव सांगळे साहेब (संचालक, ए.डी.सी.सी.बँक अहमदनगर ), मा.श्री. साहेबराव गडाख साहेब ( उपाध्यक्ष राजहंस दूध संघ संगमनेर ) व मोहनराव करंजकर,  विलासराव वर्पे, विलास कवडे, अण्णासाहेब राहिंज, भाऊसाहेब नवले, डॉ. प्रशांत पोखरकर, डॉ. सुजित खिलारी, गोरक्षनाथ नवले, शिवनाथ नवले, विलास नवले, जिजामाता सहकारी दूध संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व दुध उत्पादक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.