Now Loading

पंजाब सरकारने दिवाळीत राज्यातील जनतेला दिली भेट, विजेच्या दरात प्रति युनिट ३ रुपयांची सूट

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पंजाब सरकारने मोठी घोषणा करत राज्यातील जनतेला दिवाळी भेट दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चन्नी सरकारने वीज दरात कपात केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी पंजाबमध्ये वीज दरात प्रति युनिट तीन रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच आजपासून नवे दर लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मोफत वीज देण्याच्या निवडणुकीतील आश्वासनाची खिल्ली उडवत ते म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या सर्वेक्षणातून लोकांना स्वस्त वीज हवी आहे, मोफत वीज नको आहे.