Now Loading

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची मोठी घोषणा, म्हणाले- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाही

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश आझमगड मतदारसंघातून खासदार आहेत. अखिलेश यांचे हे विधान समोर आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी याचा इन्कार करत अखिलेश यादव यावेळी निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, असे सांगितले. गेल्या विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली नव्हती. छोट्या पक्षांशी युती करत असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.