Now Loading

लोहारी सावंगा येथे कचऱ्याचे साम्राज्य, कारवाईची गरज.

नदी काठी वसलेल्या लोहारी सावंगा गावात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालय, सरकारी दवाखाना, पोलिस स्टेशन आणि तलाठी कार्यालय अशी महत्वाच्या कार्यालयच्या पाठी मागे कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग, शेणाचे उकिरडे तयार झाले आहे. नदीकाठी काही जण उघड्यावर शौचाला बसत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोग राई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात कचरा व्यवस्थापन करण्याची गरज आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यान वर योग्य कारवाई करण्याची गरज आहे. याकडे ग्रामपंचयतीतर्फे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.