Now Loading

उत्तर प्रदेश: गाझीपूरमध्ये भीषण अपघातात 6 जणांचा रस्त्यावर मृत्यू, अनेक जखमी

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील मुहम्मदाबाद भागातील अहिरोली गावाजवळ मंगळवारी पहाटे एक अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवर आदळला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा गाझीपूर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. मात्र, ट्रकचालकाचे नियंत्रण सुटण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.