Now Loading

बदनापूर तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना मदत वाटप मात्र बावणे पांगरी मंडळ वंचित

बदनापूर / सय्यद नजाकत  ऑगस्ट ते सप्टेंबर या कालवधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून एफटी (फंड ट्रान्सफर सिस्टीम) द्वारे आज तालुक्यातील 45 हजार 505  शेतकऱ्यांच्या खात्यावर 34 कोटी 52 लाख 81 हजार 250 रुपयांची  मदत जाणार असली तरी तालुक्यातील बावणे पांगरी गटातील गावांना मात्र ही मदत टाळण्यात आल्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाने मंगळवारी वाढीव दराने निश्चित केलेल्या मदतीपैकी ७५ टक्के निधी वितरित करण्यास मंजूरी दिली आहे. राज्यासाठी २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी बदनापूर तालुक्यातील साडे चौतीस कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. तहसीलदार रमेश मुंडलोक यांनी आज (दि. २ नोव्हेंबर २०२१) रोजी तालुक्यातील बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन हा निधी तात्काळ वाटप करण्याच्या सूचना केल्या असल्यामुळे हा निधी आज किंवा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी गटातील गावांचा या यादीत समावेश नसल्यामुळे सध्या तरी त्यांना अतिवृष्टीचा निधी मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. गावनिहाय शेतकऱ्यांची संख्या बदनापूर 718, पाडळी 205, रामखेडा 329, कंडारी बु. 852, कुंडाली खु. 679, गेवराई बाजार 1004, गोकूळवाडी 423, अकोला 581, सोमठाणा 805, निकळक 748, वाल्हा 439, ढासला 476, शेलगाव 770, दावलवाडी, 582, मात्रेवाडी 260, राजेवाडी 738, पिरसावंगी 436, कुंभारी 572, मांजरगाव 657, बाजारवाहेगाव 1253, नानेगाव 596, अंबडगाव 326, धोपटेश्वर 523, देवगाव 1055, वाकुळणी 835, माळेगाव 597, दाभाडी 810, हिवरा 253, डोंगरगाव  619, विल्हाडी 713, म्हसला 398, भातखेडा 266, किन्होळा 873, मेव्हणा 275, खामगाव 1200, भाकरवाडी 932, नांदखेडा 427, हलदोला 452, जवसगाव 462, काजळा 1058, बुटेगाव 279, पानखेडा 147, रांजणगाव 228, घोटन 353, देवपिंपळगाव 1057, भिलपुरी 379, ढोकसाळ 399, उज्जैनपुरी 1241, राळा 477, केळीगव्हाण 605, नजीकपांगरी 797, भराडखेडा 598, रोषणगाव 1012, कुसळी 767, वरूडी 663, कडेगाव 840, सायगाव 935, डोंगरगाव सा. 323, तळणी लो. 718, डावरगाव 659, सिरसगाव घाटी 576, सागरवाडी 495, दुधनवाडी 327, मालेवाडी 367, खडकवाडी 404 इतक्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, महसूल प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे बावणे पांगरी मंडळातील शेतकऱ्यांना मात्र आजच्या निधी वाटप यादीत स्थान दिसून आले नाही. शेतकऱ्यांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष गजानन गीते यांनी  पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाबत निवेदन दिलेले असले तरी अद्यापतरी बावणे पांगरी सर्कलमधील गावांना निधीची उपलब्धता दिसून आलेले नाही. आजच निधी वाटप करण्याच्या सूचना : रमेश मुंडलोक बदनापूरचे तहसीलदार रमेश मुंडलोक यांनी निधीची उपलब्धता होताच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जावी म्हणून तहसील कार्यालयात बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन आजच एफटीपी प्रणालीद्वारे आज किंवा जास्तीत जास्त उद्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरील अनुदान जमा करण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या आहेत. तालुक्यातील 45 हजार 505 शेतकऱ्यांनासाठी 34 कोटी 52 लाख  81 हजार 250 रुपये वर्ग करण्यात आले