Now Loading

त्रिपुरा येथील घटनेचा निषेध तहसीलदारांना दिले निवेदन

बुलढाणा : शेगाव येथील रजा अकॅडमी च्या वतीने त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच त्रिपुरा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम, त्यांच्या धार्मिक स्थळ व मालमत्तेचे योग्य संरक्षण होण्यासाठी आवश्यक ते पावले उचलून सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार सोनवणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आपला महान भारत देश हा गंगा जमुना तहजीब (राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव)ला मानणारा असून विविधतेत एकता हा आपल्या संविधान व प्राचीन परंपरेचे वैशिष्ट्य आहे. परंतु त्रिपुरा येथे काही जातीयवादी समाजकंटकांनी तिथल्या अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्थळ (मस्जिद) तसेच घरांवर हल्ला, जाळपोळ करून निष्पाप निर्दोष लोकांना विनाकारण मारहाण करण्यात आली. त्यामुळे अल्पसंख्यांक मुस्लिम समुदाय अत्यंत घाबरलेला असून तणावाखाली आहे. हे कृत्य म्हणजे आपल्या भारत देश, संस्कृती व संविधानावर हल्ला आहे. यामध्ये राजा अकॅडमी शेगाव च्या वतीने राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्याद्वारे निवेदन पाठविण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष जमील अहमद यांच्यासह पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती