Now Loading

लहाणग्या मिहिकाने केली मूक-बधिर मुलांची दिवाळी गोड! 

दिवाळी म्हणजे धमाल, नवे कपडे, फराळ, मिठाईची रेलचेल अशीच सर्व मुलांची मज्जा चालू असते. मात्र मिहिका देवेश पाथ्रीकर या सात वर्षीय मुलीने  आपल्या घराजवळ मूक-बधिर मुलांना मिठाई वाटप करून एक नवा पायंडा पाडला आहे. मिहिकाच्या घराशेजारीच एक मूक बधिर मुलांसाठीचे केयर सेंटर आहे. या मुलांनी दिवाळी काळात विविध साहित्य बनवून स्टोल लावले होते हे बघून त्या मुलांना मिठाई वाटप करण्यासाठी मिहिकाने वडिल देवेश व आई प्रज्ञा पाथ्रीकर यांच्याकडे हट्ट धरला. तिने स्वत:साठी मिठाई, कपडे न मागता या मुलांना मिठाई घेऊन देण्याची मागणी बघून आई-वडिलही भारावून गेले. त्यांनी तात्काळ मिठाई आणून या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना वाटप केली. आजी डॉ. सौ. एम. डी. पाथ्रीकर व आजोबा डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर हे नेहमी गोरगरीबांना मदत करत असतात ते पाहून तिच्या मनातही ही भावना उत्पन्न झाली असून अवघ्या सात वर्षे वयात समाजसेवेचे हे बालकडूच तिला मिळालेले आहे.