Now Loading

१६ हजाराचा कापूस लंपास; गुन्हा दाखल

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेर्डा येथील रहिवासी शेतकरी पुंजाजी भिकाजी गावंडे (५९) यांनी शेतातील कापूस वेचुन टिनशेडमध्ये जमा केला होता. अज्ञात चोरट्याने ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरचे सकाळी ६.३० वाजेपर्यंत टिनशेडच्या दाराची साखळी तोडून अंदाजे २ विंटल कापूस (किं, १६ हजार रू.) चोरून नेला. या प्रकरणी पुंजाजी गावंडे यांनी जलंब पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुभाष चोपडे करीत आहेत.