Now Loading

भोयरे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब थोरबोले

भोयरे (तालुका मोहोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब थोरबोले यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच बालाजी साठे होते. निवडीनंतर उपसरपंच ब्रह्मदेव कोळेकर ब्रह्मदेव फंड यांच्या हस्ते थोरबोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज चव्हाण, राजू पाटील, अमर साठे आदी उपस्थित होते.