Now Loading

जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची पैसेवारी जाहीर, 742 गावांची 50 पैशांच्या आत, तर 677 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर

बुलडाणा :  सन 2021 -22 या खरीप हंगामातील जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.  ही सुधारीत पैसेवारी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची आहे. यामध्ये 742 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत आली असून 677 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर आली आहे. तालुकानिहाय 50 पैशांपेक्षा जास्त व 50 पैशांपेक्षा कमी सुधारीत पैसेवारी असलेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलडाणा – एकूण गावे 98, पैसेवारी 50 पैशांच्या पेक्षा आत, सुधारीत  पैसेवारी 46, चिखली : एकूण गावे 144, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 57, दे. राजा : एकूण गावे 64, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत, सुधारीत पैसेवारी 48, मेहकर : एकूण गावे 161, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, लोणार : एकूण गावे 91, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 58, सिं. राजा : एकूण गावे 114, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, मलकापूर : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 48, मोताळा : एकूण गावे 120, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, नांदुरा : एकूण गावे 112, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 45, खामगांव : एकूण गावे 145, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 54, शेगांव : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 64, जळगांव जामोद : एकूण गावे 119,  सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 56 आणि संग्रामपूर तालुक्यात एकूण गावे 105 असून या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त तर सुधारीत पैसेवारी 51 आहे. तरी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांपैकी बुलडाणा, दे. राजा, मेहकर, सिं.राजा, मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यातील सर्व एकूण 742 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तसेच चिखली, लोणार, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांमधील सर्व 366 गावांची सुधारीत पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण जिल्ह्याची सुधारीत पैसेवारी 51 आहे, असे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे