Now Loading

मतदार यादीतील दुरूस्ती, वगळणी व नविन नोंदणीसाठी विशेष मोहिम ·         11 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन ·         13, 14 व 27, 28 नोव्हेंबर रोजी होणार विशेष मोहिम

बुलडाणा, : उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रमानुसार 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात पदनिर्देशीत ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार यादीतील नावात दुरूस्ती करणे, वगळणे किंवा नवीन नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात 13, 14 व 27,28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. ज्या मतदारांनी अद्यापही मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेले नाही, अशा मतदारांनी या विशेष मोहिमेच्या दिनांकास आपले मतदान केद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आपले विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावे. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार मतदार यादीतील नाव दुरूस्त करणे, नाव वगळणे तसेच नविन नाव नोंदणी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्यात याकरिता 16 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मतदार यादीचे वाचन होणार आहे. या विशेष ग्रामसभेस सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपली मतदार यादीतील नाव अद्ययावत, नवीन नोंदणी किंवा वगळायचे असल्यास वगळून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती तथा उपजिल्हाधिारी श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.