Now Loading

सत्रासेन येथील किसन पाड्यावर आदिवासी बांधवांना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे दिवाळी फराळ वाटप"

सत्रासेन येथील किसन पाड्यावर आदिवासी बांधवांना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे दिवाळी फराळ वाटप" सत्रासेन ता. चोपडा; दि.२(प्रतिनिधी) -  सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील आदिवासी  गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा सेवाभावी संस्था  सरसावल्या आहे. ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे.   रोटरी क्लब ऑफ चोपडा  पुढाकार घेऊन सत्रासेन पासून जवळच किसन पाडा तसेच उत्तमनगर व आणि रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे  यांनी हा दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवला आहे. गावातील  किसन पाडा, उत्तमनगर  येथे  १०० जणांना मिठाई, फराळ असे साहित्य वितरण केले. समाजातील सधन व्यक्तींनी गरिबाच्या घरी जाऊन मिठाई व दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी आनंदाने साजरी करण्याचे आवाहनही रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ चोपडा  क्‍लबकडून फराळ  गोरगरीब व गरजू लोकांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने चोपडा  क्‍लब ऑफ चोपडा तर्फे "जीवन आनंद' या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेघर, गरजू, गरीब कुटुंबीयांना रविवारी (ता.३१) दिवाळी फराळाचे वाटप केले.  रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले यांच्या हस्ते १०० गरीब व गरजू महिला व पुरुषांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरी  क्‍लबचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले, सचिव प्रविण मिस्त्री, प्रकल्प प्रमुख  अरुण सपकाळे,बि. एस.पवार, धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ सचिव ज्ञानेश्वर भादले,रुपेश पाटील, सुनील महाजन, पृथ्वीराज राजपूत, विलास पी पाटील, विलास कोष्टी, प्रदीप पाटील(बा),सुनीता मिस्त्री,  सत्रासेन आर. आर. सी. सी. अध्यक्ष विनोद पाटील यांनी मदत केली जमा. ¶रोटरी क्लब ऑफ चोपडा आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेतर्फे शंभर आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. यासाठी चोपडा  येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा अध्यक्ष पंकज बोरोले  यांनी आर्थिक मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. आर्थिक परिस्थितीमुळे घरात रोजचे जेवणदेखील व्यवस्थित मिळत नाही. अशांच्या घरात दिवाळीच्या वेळेस गोडधोड अन्नपदार्थ कुठून येणार, असा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून गरीब, गरजू कुटुंबीयांना फराळ व साहित्य देऊन दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.                     अध्यक्ष- रोटे पंकज बोरोले रोटरी क्‍लब ऑफ चोपडा